विनोदी उखाणे महिला व पुरुषांसाठी
विनोदी उखाणे महिलांसाठी ** रावांची थोरवी मी सांगत नाही, कितीही प्यायले तरीही ते कधीही झिंगत नाहीत. इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव, *** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव. सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून, *** रावांचे नाव घेते पाच गडी राखून. पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, *** रावांचे नाव घ्यायला अडलय माझे खेटर. एक होती चिऊ, एक होती काऊ, *** रावांचे नाव घेते, डोके नका खाऊ. इवले इवले हरीण, त्याचे इवले इवले पाय, *** राव आले नाहीत अजून, पिऊन पडले की काय? एक होती चिऊ, एक होती काऊ, गणपत रावांचा नाव घेते, डोकं नका खाऊ. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे. बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या, गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या. लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन गणपतरावांच्या घशात अडकला घास. रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल, गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल. समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू, गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू. बदामाचा केला हलवा, त्यात काजू टाकले किसून, गणपतराव आमचे बिड्या पितात संडासात बसून. मोबाईलवर एफ.एम ऐकते...