विनोदी उखाणे महिला व पुरुषांसाठी

विनोदी उखाणे महिलांसाठी

 ** रावांची थोरवी मी सांगत नाही,

कितीही प्यायले तरीही ते कधीही झिंगत नाहीत.


इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव,

*** रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव.


सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून,

*** रावांचे नाव घेते पाच गडी राखून.


पावाबरोबर खाल्ले अमूल बटर,

*** रावांचे नाव घ्यायला अडलय माझे खेटर.


एक होती चिऊ, एक होती काऊ,

*** रावांचे नाव घेते, डोके नका खाऊ.


इवले इवले हरीण, त्याचे इवले इवले पाय,

*** राव आले नाहीत अजून,

पिऊन पडले की काय?


एक होती चिऊ, एक होती काऊ,

गणपत रावांचा नाव घेते, डोकं नका खाऊ.


चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे,

घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे.


बागेमध्ये असतात, गुलाबांच्या कळ्या,

गणपतरावांचे दात म्हणजे दुकानाच्या फळ्या.


लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास,

अन गणपतरावांच्या घशात अडकला घास.

रेशमी सदऱ्याला प्लास्टिकचे बक्कल,

गणपतरावांना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल.


समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,

गणपतराव दिसतात साधे, पण आतून एकदम चालू.

बदामाचा केला हलवा, त्यात काजू टाकले किसून,


गणपतराव आमचे बिड्या पितात संडासात बसून.




मोबाईलवर एफ.एम ऐकते कानात हेडफोन टाकून,


आणि गणपतरावांना मिस कॉल देते एक रुपया बॅलन्स राखून.




शिडीवर शीडी बत्तीस शिडी,


गणपतराव ओढतात विडी नि मी लावते काडी.




तेलाच्या दिव्याला तुपाची वात,


शंकररावांशी करून लग्न करून लावली आयुष्याची वाट.




रेशमाचा सदरा त्याला प्लास्टिकचे बक्कल,


गणपतराव आहेत सुंदर पण डोक्याला टक्कल.

(विनोदी उखाणे पुरुषांसाठी) 



अंगणात पेरले पोतेभर गहू,


लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ.




कंप्युटरला असते फ्लॉपी डिस्क,


***हिच्याशी लग्न करून मी घेतलीय मोठी रिस्क.




कपावर कप सात कप, त्यावर ठेवली बशी,


माझी बायको सोडून सर्वांच्या बायका म्हशी.




चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,


लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ?

वाचकमित्रहो, वरीलप्रमाणे दिलेली विनोदी पुरुषांची आणि महिलांसाठीची उखाणे तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे. आपली प्रतिक्रिया देऊन अवश्य कळवा

Marathi ukhane. Com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नवरदेवाचे उखाणे

एक दम भन्नाट असे नवरीचे उखाणे