एक दम भन्नाट असे नवरीचे उखाणे
एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांनापैकी एक आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. प्रत्येक स्त्रीच्या लग्नाविषयी काही अपेक्षा असतात जसे काळजी करणारा नवरा हवा असणे, प्रेमळ तसेच स्वभावाने अगदी छान असा नवरा प्रत्येक मुलीला हवा असतो.
लग्नासाठी बऱ्याच मुली उखाणे शोधत असतात. आजच्या लेखात नवरी साठी स्पेशल उखाणे (Marathi Ukhane for Female) तेही मराठी मध्ये आपल्या साठी घेऊन आलोत. ज्या उखाण्यांचा फायदा आपल्याला लग्नात होईल. तसेच आपल्या एखाद्या मैत्रिणीं चा विवाह असेल तर त्या मैत्रिणीला सुध्दा या उखाण्यांमुळे फायदा होईल, आणि लग्नात उत्कृष्ट उखाणे (Marathi Ukhane) बोलल्यामुळे समोरच्यावर एक उत्तम प्रभाव पडणार. तर चला पाहूया नवरी साठी उखाणे तेही मराठीत
कारण त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य एका व्यक्तीसोबत काढायचे असते. मग त्या व्यक्तीने त्यांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ द्यावी, आणि आयुष्यभर त्यांची काळजी करावी या प्रमाणे.
- 1) गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
- …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
- 2) हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
…. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे - 3)सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
…. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. - 4) चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा - 5) बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
- …..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
- 6) वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
- .. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
- 7) अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
- …. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!
- 8) छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
- … रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
- 13)मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
- … रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
21)ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.
22)कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,
23)शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,
24)श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.
25)ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,
… रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा