नवरदेवाचे उखाणे

1) संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.

2) पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक. 

3)पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,

4) लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत  राहते एकनिष्ठ  प्रेम,  …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

5)पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,

6)लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत  राहते एकनिष्ठ  प्रेम,  …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

7) जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.


8) सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.

9) हातात हात घेऊन सप्तपदी चालतो,

शतजन्माचे नाते …. सोबत जोडतो.


10)असावी नेहमी हसतमुख बोलणे असावे गोड

…. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.


11)सोन्याच्या कप आणि चांदीची बशी

…. माझी आहे जणू उर्वशी.

12)दुधापासून बनते दही आणि तूप

…. आवडते मला खूप खूप.


13)लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम

…. ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.


14)मोबाईल घेतला नवीन सारखे करतो एसएमएस

…. आज झाली माझी मिसेस.

15)लग्नाच्या स्टेशनवर सुरू आमचा जीवन प्रवास

…. ला भरवतो गुलाबजामचा घास.


16)जन्म दिला मातेने पालन केले पित्याने

…. गळ्यात बांधतो मंगळसूत्र पती या नात्याने.

17)पाहताक्षणी चढली प्रेमाची धुंदी,

…. मुळे झाले जीवन सुगंधी.

18)कावळा करतो काव काव चिमणी करते चिऊ चिऊ,

…. नाव घेतो बंद करा तुमची टिव टिव.

19)“पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नाव घेऊन राखतो मी सर्वाचा मान.”

20)चंद्राला पाहून येते भरती सागराला, __ ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.”

21)लग्नाचा वाढदिवस करू साजरा, __ तुला आणला मोगऱ्याचा गजरा”.


22).“चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, __चे नाव घेऊन सोडतो कंकण.”


23)जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी __म्हणजे लाखात सुंदर नार”.


24).“अस्सल सोने चोविस कॅरेट, __ अन् माझे झाले आज मॅरेज”.


25)“चंद्राला पाहून भरती येते सागराला, __ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.”


26प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,__सारखा हिरा.


27)“काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,__ च्या साह्याने सुखी झाले जीवन.


28)“यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,__. सोबत सुखी आहे सासरी.”“

29)आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, __ चं नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.”

30)दही,साखर, तूप,__ मला आवडते खूप.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विनोदी उखाणे महिला व पुरुषांसाठी

एक दम भन्नाट असे नवरीचे उखाणे